माजी केंद्रीयमंत्री खासदार नारायण राणे यांचे राजापूरात स्वागत

राजापूर (प्रतिनिधी): माजी केंद्रीयमंत्री खासदार नारायण राणे हे रविवारी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले असताना राजापूरात महामार्गावरील एसटी डेपो समोर खासदार नारायण राणे यांचे राजापूर तालुका भाजपाचे वतीने स्वागत करण्यात आले.
खासदार राणे हे रविवारी चिपळूण दौऱ्यावर आले होते. सिंधुदुर्गकडून चिपळूणकडे रवाना होताना राजापूरात त्यांचे भाजपाचे वतीने पश्चिम मंडळ तालुका अध्यक्ष सुरेश गुरव यांनी पुष्पगुच्छ देवून खासदार राणे यांचे स्वागत केले. याप्रसंगी उपस्थीत असलेल्या सौ. निलमताई राणे यांचेदेखील भाजपाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी श्री. राणे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला.

 

 

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस रविंद्र नागरेकर, भाजपाच्या महिला प्रदेश सचिव सौ. शिल्पा मराठे, भाजपा ओबीसी प्रदेश सरचिटणीस अनिल करंगुटकर, भाजपा महिला आघाडीच्या सौ. सूयोगा जठार, सौ. शीतल पटेल, दीपक बेंद्रे,अरविंद लांजेकर, अमर वारिशे, प्रकाश भिवंदे, अमोल सिनकर, विनायक कदम, आशिष मालवणकर, फारूख साखरकर, शिवसेना तालुका संघटक भरत लाड, मोहन घुमे, धनंजय मराठे, मंगेश तिर्लोटकर, गोपाळ गोंडाळ, अमृत तांबडे, उल्हास विचारे, श्री. धांगट आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.