स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून 02 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस (SBD) म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने स्वच्छता हि सेवा (SHS) मोहिम दि.14 सप्टेंबर 2024 ते 02 ऑक्टोबर 2024 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात येत आहे. या वर्षीच्या स्वच्छता ही सेवा 2024 साठी “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता” ही थीम केंद्र शासनाने निश्चित केली आहे. त्यानुसार स्वच्छता की भागीदारी अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व सोसायटी / अपार्टमेंट मध्ये स्पर्धेचे नियोजन करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धेसाठी खालील मुद्द्यांच्या आधारे नियोजन करण्यात येणार आहे.
➢ सहभागाकरिता निकष :-
• सोसायटी / अपार्टमेंट जिल्ह्यातील ग्रामपंचायत परिक्षेत्रातील असणे आवश्यक
• सोसायटी / अपार्टमेंट नोंदणीकृत असणे आवश्यक
•
➢ सहभागाकरिता नोंदणी :-
• सोसायटी / अपार्टमेंट यांनी मा. गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे अर्ज सादर करावा. (अर्जाचा नमुना जिल्हा परिषद संकेतस्थळ www.zpratnagiri.org वर प्रसिध्द करण्यात आलेला आहे.)
• अर्जासोबत सोसायटी / अपार्टमेंट नोंदणीकृत असल्याबाबतचा दाखला सादर करावा.
• सोसायटी / अपार्टमेंट मध्ये स्वच्छता विषयक केलेल्या कामांचा अहवाल सोबत सादर करावा.
•
➢ स्पर्धेचा कालावधी :-
क्र.
तपशिल
कालावधी
1)
स्वच्छ सुंदर सोसायटी / अपार्टमेंट स्पर्धेची प्रसिध्दी
दि.14/09/2024 ते दि.17/09/2024
2)
नोंदणी (अर्ज सादर करण्याची मुदत)
दि.20/09/2024 रोजी सांय. 5.00 वा. पर्यंत
3)
तालुकास्तरीय तपासणी
दि.25/09/2024 ते दि.26/09/2024
4)
तालुकास्तरीय निकाल
दि.27/09/2024
5)
जिल्हास्तरीय तपासणी
दि.29/09/2024 ते दि.30/09/2024
6)
जिल्हास्तरीय निकाल
दि.01/10/2024
7)
पारितोषिक वितरण
दि.02/10/2024
➢ मुल्यमापनाचे निकष :-
• घनकचरा व्यवस्थापन
✓ कचरा वर्गीकरण
✓ ओला कचरा प्रक्रिया
✓ प्लास्टिक कचरा साठवणूक
• सांडपाणी व्यवस्थापन
✓ घरातुन बाहेर पडणारे पाणी (Grey water)
✓ शौचालयातुन बाहेर पडणारे पाणी (Black water)
• पाऊस पाणी संकलन
• Garden/ Greenery
• इतर (Innovative)
➢ गुणांकन :-
तपशिल
गुण
•
घनकचरा व्यवस्थापन
✓
कचरा वर्गीकरण
15
✓
ओला कचरा प्रक्रिया
15
✓
प्लास्टिक कचरा साठवणूक
15
•
सांडपाणी व्यवस्थापन
✓
घरातुन बाहेर पडणारे पाणी (Grey water)
15
✓
शौचालयातुन बाहेर पडणारे पाणी (Black water)
15
•
पाऊस पाणी संकलन
10
•
Garden/ Greenery
10
•
इतर (Innovative)
5
एकूण –
100
➢ निवड प्रक्रिया :-
• प्रथम मुल्यमापन तालुकास्तरीय समिती मार्फत केले जाईल.
• मुल्यमापनामध्ये दिलेल्या निकषानुसार व त्यासाठी असलेल्या गुणानुसार सोसायटी / अपार्टमेंट यांना गुणानुक्रम देण्यात येईल.
• गुणानुक्रमानुसार तालुकास्तरावर प्रथम येणा-या सोसायटी / अपार्टमेंटची निवड जिल्हास्तरीय तपासणीसाठी करण्यात येईल. त्यांची तपासणी जिल्हास्तरीय समिती मार्फत केले जाईल.
• मुल्यमापनामध्ये दिलेल्या निकषानुसार व त्यासाठी असलेल्या गुणानुसार सोसायटी / अपार्टमेंट यांना जिल्हास्तरीय समिती मार्फत गुणानुक्रम देण्यात येईल.
• गुणानुक्रमानुसार जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय येणा-या सोसायटी / अपार्टमेंट यांना पारितोषिक दिले जाईल.
•
➢ तपासणी समिती तालुकास्तर :-
• गट विकास अधिकारी
• उप अभियंता (ग्रापापु)
• तालुका आरोग्य अधिकारी
• विस्तार अधिकारी (पंचायत)
➢ तपासणी समिती जिल्हास्तर :-
• मा.अति. मुख्य कार्यकारी अधिकारी
• उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पा. व स्व.)
• जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (पा. व स्व.)
➢ पारितोषिक जिल्हास्तर :-
• प्रथम – 50,000/-
• द्वितीय – 30,000/-
• तृतीय – 20,000/-
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व सोसायटी/अपार्टमेंट यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेवून स्वच्छता ही सेवा 2024 अभियान यशस्वी करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले आहे.










