वेलदूर नवानगर शाळेमध्ये सागरी किनारा स्वच्छता अभियानास ग्रामस्थांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद

गुहागर | प्रतिनिधी : वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता ही सेवा या मोहिमेंतर्गत 21 सप्टेंबर 2024 रोजी सागरी किनारा स्वच्छता श्रमदान मोहीम राबवण्यात आली .सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री मनोज पाटील सर यांनी ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आणि जाणीव जागृती निर्माण केली . या मोहिमेसाठी शिक्षण तज्ञ शंकर कोळथरकर तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मारुती रोहिलकर ,मनोज पावसकर, नारायण रोहिलकर, उमेश रोहिलकर, अमोल वायगनकर, विकास रोहिलकर तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सुहानी नाटेकर ,सुरक्षा रोहिलकर, निशा जाधव, अंगणवाडी सेविका सोनिया नाटेकर, मत्स्यगंधा कोळथरकर आणि गावातील विशाखा रोहिलकर, शैलेजा रोहीलकर, माधवी रोहिलकर, सुहासिनी रोहिलकर, प्रिया रोहिलकर, योगिनी तिमशेकर , विशाखा नाटेकर ,जयमाला रोहीलकर ,सुगंधा रोहिलकर हे ग्रामस्थ आणि नवानगर शाळेचे शिक्षक वृंद अंजली मुद्दामवार आणि अफसाना मुल्ला हे सहभागी झाले.

 

 

आणि सागरी किनारा स्वच्छता अभियान गावातील ग्रामस्थांच्या सहकार्याने उत्स्फूर्तपणे पार पडला. तसेच शाळा स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छते विषयी जाणीव जागृती निर्माण होण्यासाठी पथनाट्य आयोजित करण्यात आले आणि स्वच्छता विषयी महत्व पटवून दिले. तसेच निबंध आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. प्लास्टिक न वापरणे बाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी ग्रामस्थांच्या सहभागाने प्लास्टिक मुक्त रॅली काढण्यात आली.