NAB will provide smart phones to visually impaired students
इच्छुक विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन
सावंतवाडी । प्रतिनिधी : नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड युनिट महाराष्ट्र नशिकतर्फे दृष्टीबाधित विद्यार्थांना स्मार्ट फोन देण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन नॅबतर्फे करण्यात आले आहे.
यासाठी विद्यार्थी ९ वी पासून पुढे शिक्षण घेणारे असावे. विद्यार्थी सध्या शिक्षण घेत असावा. ज्या विद्यार्थ्याची निवड होईल त्याच्याशी नॅब युनिट महाराष्ट्र संपर्क साधेल. या साठी अंध प्रमाण पत्र, आधार कार्ड, मार्क शीट, पास पोर्ट साईज फोटो, फोटोच्या मागे नाव लिहावे असे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, इच्छुक विद्यार्थ्यांनी नॅब युनिट महाराष्ट्र नाशिकः.E mail – [email protected] तसेच मोबा . 8805325000 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन नॅब सिंधुदुर्गचे अध्यक्ष अनंत उचगांवकर व सचिव सोमनाथ जिगजिंनी यांनी केले आहे