वायरी, तारकर्ली, देवबाग येथे भूमिगत वीज वाहिनी कामांचा भाजपा नेते निलेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ

वायरी, तारकर्ली, देवबाग येथे भूमिगत वीज वाहिनी कामांचा भाजपा नेते निलेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ

केंद्र शासनाच्या माध्यमातून सुमारे 94 कोटी मंजूर निधीतून होणार काम पुर्ण

अमित खोत | मालवण : मालवण तालुक्यातील वायरी-भूतनाथ, तारकर्ली, देवाबाग गावात केंद्र शासनाच्या माध्यमातून खा. नारायण राणे यांच्या पुढाकारातून मंजूर झालेल्या सुमारे 94 कोटी निधीतून भूमिगत वीज वाहिनी कामाचा भूमिपूजन शुभारंभ भाजपा नेते माजी खा. निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला.

या विकास कामासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांचा पाठपुरावाही महत्वपूर्ण राहिला. अशी माहिती भाजपा मालवण तालुकाध्यक्ष व शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिली. भूमिगत वीज वाहिन्या कामाबाबत येथील ग्रामस्थ तसेच पर्यटन व्यावसायिक यांनी समाधान व्यक्त केले आहे.

वायारी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत निलेश राणे नतमस्तक झाले. त्यानंतर वायरी, तारकर्ली, देवबाग येथे ग्रामस्थ व पर्यटन व्यावसायिक यांच्या उपस्थितीत भूमिपूजन झाले.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, तालुका प्रभारी आप्पा लुडबे, जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, शहरअध्यक्ष बाबा मोंडकर, मालवण शहर प्रभारी संतोष गांवकर, वायरी भूतनाथ प्रभारी दाजी सावजी, शक्तीकेंद्र प्रमुख केदार झाड, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, विभाग प्रमुख कमलाकांत पारकर, तारकर्ली पर्यटन विकास संस्था अध्यक्ष सहदेव साळगावकर, मिलिंद झाड, रवींद्र खानविलकर, देवानंद लोकेगावकर, दर्शन वेंगुर्लेकर, राम चोपडेकर, मंदार लुडबे, मुन्ना झाड, विकी लोकेगावकर, शाम झाड, जयवंत सावंत, मिथिलेश मिठबावकर, अरुण तळगांवकर, मोहन कुबल, शशांक कुमठेकर, चेतन मुसळे, निषय पालेकर यांसह भाजपा पदाधिकारी, महिला पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, तारकर्ली पर्यटन विकास संस्था पदाधिकारी, पर्यटन व्यावसायिक, ग्रामस्थ उपस्थित होते.