दिव्यांग विद्यार्थी साहित्य वाटप कार्यक्रम लांजा तहसील कार्यालय येथे संपन्न

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थी साहित्य वाटप कार्यक्रम नुकताच लांजा तहसील कार्यालय येथे पार पडला. या कार्यक्रमात एकूण १६ बहु विकलांग विद्यार्थ्यांना कमोड स्टूल तर सहा बहु विकलांग विद्यार्थ्यांना व्हील चेअर, श्रवणयंत्र यांचे वाटप करण्यात आले .
शासनाच्या समग्र शिक्षा अभियान समावेशित शिक्षण विभाग पंचायत समिती लांजा यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजन साळवी यांच्यासह नायब तहसीलदार गोसावी, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग, लांजा नगरपंचायती चे प्रशासकीय अधिकारी अविराज पाटील आदिंसह अन्य अधिकारीवर्ग उपस्थित होते.
या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बहु विक्रांग विकलांग अशा तालुक्यातील सोळा विद्यार्थ्यांना कमोड स्टुलचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे सहा विद्यार्थ्यांना व्हीलचेअर ,श्रवण यंत्र, सीपी चेअर यांचे वाटप करण्यात आले.