राजापूर तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा संपन्न

राजापूर (वार्ताहर): क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पंचायत समिती राजापूर संचलित राजापूर तालुका क्रीडा शिक्षक व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना आयोजित शालेय कबड्डी स्पर्धा नुकत्याच तालुक्यातील आबासाहेब मराठे महाविद्यालय व माध्यमिक विद्यालय जुवाठी येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या.

 

 

स्पर्धेचे उदघाटक म्हणून जिल्हा क्रीडाधिकारी विजय शिंदे सर यांनी उपस्थिती दर्शवली त्याचबरोबर आबासाहेब मराठे महाविद्यालयाचे प्राचार्य राजाराम राठोड, प्राध्यापक श्री. देवकर व इतर स्टाफ तसेच जुवाठी हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री. गोवळकर, क्रीडा शिक्षक श्री. सुर्यवंशी व सर्व स्टाफ आणि कर्मचारी उपस्थित होते.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजापूर तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना अध्यक्ष विजय पाटील, क्रीडा समन्वयक व्यंकट नालापल्ले, उपाध्यक्ष विकास कुंभार,सचिन रावण, जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद शिवणेकर, सर्व पदाधिकारी, त्याच बरोबर तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, मार्गदर्शक, व्यवस्थापक यांचे खूप उत्तम व बहुमोल असे सहकार्य लाभले.

 

 

या स्पर्धेतील विजेत्या संघाची नावे पुढीलप्रमाणे १४ वर्षे वयोगट मुलगे
आचार्य नरेंद्र विद्यामंदिर, भू १४ वर्षे वयोगट मुलीआचार्य जावडेकर विद्यालय, विलये १७ वर्षे वयोगट मुलगे सरस्वती विद्यामंदिर, पाचल १७ वर्षे वयोगट मुली रा. ब. उ. देसाई विद्यामंदिर, कुंभवडे १९ वर्षे वयोगट मुलगे सरस्वती विद्यामंदिर, पाचल१९ वर्षे वयोगट मुली निर्मला भिडे जनता विद्यालय, कोंडये विजेत्या संघांची निवड जिल्हा स्तरीय स्पर्धे करता झाली आहे.