क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या विद्यमाने जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने चिपळूण येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धेत माखजन इंग्लिश स्कूल माखजन व अॅडव्होकेट पी. आर. नामजोशी कनिष्ठ महाविद्यालय मधील अकरा विद्यार्थ्यांची स्क्वॅश या खेळ प्रकारात विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून प्रत्येक गटात 35 खेळाडू सहभागी झाले होते त्यापैकी 19 वर्षाखालील गटात तन्वी पकडे, शमिका गोटेकर, चांदणी भुवड, श्रेया फणसे, प्रणव भुवड ; सतरा वर्षाखालील गटात मौलिका जाधव , वर्धा भागवत, ओमकार दहिवलकर तर 14 वर्षाखालील गटात परी विचारे, कृतिका गोताड व आरुष पवार या खेळाडूंची निवड विभागीय स्पर्धेसाठी झालेली आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय बापट, उपाध्यक्ष शशिकांत घाणेकर संस्था पदाधिकारी व मुख्याध्यापिका रुही पाटणकर यांनी गुणवंत खेळाडूंचे व त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक निखिल वारके व अभिजीत सुर्वे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.












