चिपळूण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी रत्नागिरी उत्तर जिल्ह्यातील युवा संघटना मजबूत करण्यासाठी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पदावर युवकांचे प्रेरणास्थान संकल्प अवेरे यांची नियुक्ती केली आहे. नियुक्ती पत्र दिल्यानंतर संकल्प अवेरे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस निलेश सुर्वे, वसंत ताम्हणकर, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष मंगेश रांगळे, गुहागर तालुका सरचिटणीस सचिन ओक, चिपळूण ग्रामीण पश्चिम तालुका सरचिटणीस गणेश हळदे, युवा मोर्चा माजी जिल्हा उपाध्यक्ष संगम मोरे, गणेश साळवी, प्रणय वाडकर, सिद्धेश खेडेकर, आयुष घडशी, श्रवण थरवल, सुजल गोरीवले, संयोग गोरीवले, विशाल लकेश्री, प्रकाश लांजेकर, अतिश घडशी, तेजस सोलकर, श्रेयस कातकर, आर्यन घडशी आदी उपस्थित होते.













