कल्पना कॉलेज लांजा तर्फे कशेळी बीचवर स्वच्छता मोहीम

 

 

लांजा (प्रतिनिधी) जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून कल्पना कॉलेज लांजा तर्फे एक दिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कशेळी बीच वर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली

या सहली दरम्यान,राजापूर तालुक्यातील धुतपापेश्वर मंदिर, बारसु कातळशिल्प, महाकाली मंदिर (आडिवरे), देवघळी बीच, कनकादित्य मंदिर (कशेळी) तसेच गावखडी बीच आणि पूर्णगड किल्ला या ठिकाणांना भेट देण्यात आली

या सहलीचा उद्देश हा हॉटेल मॅनेजमेंट च्या विद्यार्थ्यांना आपल्या परिसरात असलेल्या पर्यटन स्थळांची ओळख व्हावी, त्यांची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी तसेच पर्यटकांसाठी कोणत्या सोयी सुविधा असायला हव्यात याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. आणि सर्व ठिकाणी स्वच्छतेबाबत जनजागृती करणारे करणारे फलक देखील लावण्यात आले. यावेळी कशेळी बीच वर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. परिसरातील पाण्याच्या बॉटल्स, खाऊचे रॅपर्स, कागद, दारूच्या बाटल्या आदी कचरा जमा करण्यात आला.

पर्यटकांनी देखील कॉलेज च्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या.