प्रतिनिधी | रोहन कांबळे
कोल्हापूर: आजरा तालुक्यातील मौजे घाटकरवाडी हद्दीत राजाराम आनंदा तांबेकर याच्या घरी व गोठ्याच्या तपासणीत राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांच्या संयुक्त छाप्यात ३ लाख ७७ हजार ६८० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई चंदगड राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली.
पांढऱ्या रंगाच्या टाटा सुमो वाहन क्र.एम.एच.४५.एन ०३८८ वाहनामध्ये गोवा बनावट विदेशी मद्याचे गोल्डन एस ब्लू फाईन विस्कीचे १८० मिलीचे १९ बॉक्स मिळाले.आरोपी राजाराम आनंदा तांबेकर याच्यावर विनापरवाना साठा केल्याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एक्साईज आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी,राज्य उत्पादन शुल्कचे कोल्हापूर विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक स्नेहलता नरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली एक्साईज गडहिंग्लज,हातकणंगले व भरारी पथकाने ही संयुक्त कारवाई केली.गुन्ह्याचा अधिक तपास गडहिंग्लज विभागाचे दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे करत आहेत.












