तळवली | वार्ताहर : नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून अश्मी इंडियाच्या सहसंस्थापक कोमल अजिंक्य गुरव यांच्यावतीने महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून समीर देसाई उपस्थित होते.यावेळी महिलांना मोफत भेटवस्तू तसेच चांदीची दुर्गा मातेची मूर्ती भेट देण्यात आली.तसेच लकी ड्रॉ च्या माध्यमातून पैठणीचे पारितोषिक ठेवण्यात आले होते.यामध्ये लतिका कदम या पैठणी विजेत्या ठरल्या.या कार्यक्रमाला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.











