कुणकेश्वर येथील सागरी पुलाचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे भूमिपूजन, प्रत्यक्ष स्थळी आ. नितेश राणे भूमिपूजन करणार

रेवस-रेडी सागरी महामार्गाच्या संरेखेवर कुणकेश्वर, ता. देवगड येथील सागरी पुलाचे भूमिपूजन समारंभ दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित केला जाईल. या समारंभात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात येईल. तर प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळी कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे उपस्थित राहून भूमिपूजन करणार आहेत . हा कार्यक्रम कुणकेश्वर येथील बीचवर सकाळी ११:०० वाजता, १३ ऑक्टोबर २०२४ रोजी होणार आहे.

या समारंभात उपस्थित मान्यवरांमध्ये नामदार देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री, गृह, विधी व न्याय), ना अजित पवार (उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजन), आणि ना .रविंद्र चव्हाण (मंत्री, सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री, सिंधुदुर्ग जिल्हा) यांचा समावेश असेल.

याव्यतिरिक्त ना. दादाजी भुसे (मंत्री, सार्वजनिक बांधकाम), ना. दीपक केसरकर (मंत्री, शालेय शिक्षण, मराठी भाषा), तसेच लोकसभा सदस्य खा .नारायण राणे आणि विधानपरिषद सदस्य निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे यांची उपस्थिती असेल.
या मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभ सकाळी ११:०० वाजता संपन्न होईल.