खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील धामणंद पंधरागाव विभाग जनता माध्यमिक शिक्षण संस्था संचलित यशवंत विद्यालय व कनिष्ठ कला वाणिज्य महाविद्यालयाच्या नूतन इमारतीच्या बांधकामासाठी ७ लाख रुपयांचा धनादेश शिक्षण संस्थाध्यक्ष अनंत पालांडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते बबन जाधव यांचे जावई व सावर्डे येथील संजीव चव्हाण यांनी ठाणे-मुंबई येथील रिटेनमायर इंडिया प्रा.लि. कंपनीच्या माध्यमातून ७ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले. याप्रसंगी सचिव संदीप म्हापदी. उमेश पालांडे आदी उपस्थित होते.










