मनसे तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या वतीने आयोजन
मोडकाआगर | वार्ताहर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा क्षेत्र व अपरांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चिपळूण यांच्या सहकार्याने मोफत महा आरोग्य तपासणी शिबीर सोमवार दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ रोजी जानवळे शाळा नं. १ येथे आयोजित करण्यात आला आहे. या महाआरोग्य तपासणी शिबिरामध्ये ब्लड प्रेशर, पल्स, वजन उंची वाढणे, ऑक्सीजन चिकित्सा तपासणी, अस्थिरोग तपासणी, हृदयरोग तपासणी, दम लागणे,वजन वाढणे, उच्च रक्तदाब थायरॉईड, डोकेदुखी, गुडघेदुखी, पित्ताचा त्रास, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, विद्यार्थ्यांसाठी ब्लड ग्रुप व आरोग्य शिबिर, नाक कान घसा व डोळे , रक्तगट यांचे मोफत आरोग्य तपासणी होणार आहे. शिबिरा दरम्यान अर्ध्या किमतीत दर्जेदार चष्मे मिळतील. यासाठी सुरेंद्र ऑप्टिक्स.. प्रोप्रा. सुरेंद्र निकम यांचे सहकारी मिळणार आहे. तरी या महाआरोग्य शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन गुहागर तालुका मनसे संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, उप जिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर यांनी केले आहे.












