आज रात्री १२ वाजल्यापासून होणार अंमलबजावणी
मुख्यमंत्र्यांची राज्य मंत्रीमंडळ बैठकीत मोठी घोषणा
मुंबई : सध्या राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) वेध लागले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नेतेमंडळींकडून जय्यत तयारी सुरु आहे. अशातच उद्यापासून विधानसभा निवडणुकीबाबत आचारसंहिता (Code Of Conduct) लागण्याची शक्यता असून त्यापूर्वी आज महायुती सरकारने शेवटची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मोठी घोषणा केल्याची माहिती समोर आली आहे.
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील पाच टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना संपूर्ण टोलमाफीचा (Toll Free) निर्णय घेतला आहे. वाशी, ऐरोली, मुलुंड,दहिसर आणि ठाणे येथील टोलनाक्यावर हलक्या वाहनांना संपूर्ण टोलमाफी करण्यात आली आहे. आज रात्री १२ वाजल्यापासून याबाबतची अंमलबजावणी होणार असून सर्वसामान्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.











