रतन टाटांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर सोहळे साजरे न करण्याचे आवाहन
सावंतवाडी : उद्योजक रतन टाटा यांच्या प्रेरणेतून आपण आपले औद्योगिक विश्व साकारले असून त्यांच्या आदर्शांवर आजवरची वाटचाल केली असे स्पष्ट करत युवा उद्योजक तथा भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आपला यंदाचा वाढदिवस हा रतन टाटा यांच्या स्मृतीला अर्पण केला आहे. त्यामुळे त्यांनी जनतेला विनंती केली आहे की कोणीही पुष्पगुच्छ किंवा हार आणू नये, वृत्तपत्र किंवा बॅनर लावत शुभेच्छा देऊ नये, तसेच केक कापून आपला वाढदिवस साजरा करू नये. लोकांच्या हिताचे उपक्रम मात्र पूर्वनियोजनाप्रमाणे होतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुढील प्रमाणे जनहिताचे कार्यक्रम आयोजित केले आहेत.

असे कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहेत. स्वर्गीय रतन टाटा यांना अभिप्रेत जनसेवेच्या विविध कार्यक्रमातून आपण रतन टाटांच्या स्मृतीला वाढदिवसातून अभिवादन करत आहोत असे त्यांनी म्हटले आहे.












