माखजन येथील फॅन्सी ड्रेस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

*माखजन l वार्ताहर*       संगमेश्वर तालुक्यातील माखजन ग्रामदेवतेच्या मंदिरात वाघजाई मंदिर ट्रस्ट व गावातील हौशी युवक वर्गाकडून घेण्यात आलेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला छोट्या गटात ४७ तर मोठ्या गटात ११ स्पर्धक सहभागी झाले होते.

मोठ्या गटात तुषार कातकर याचा प्रथम,विश्वास हेमण (द्वितीय),पार्थ घेवडे (तृतीय) क्रमांक पटकावला.

तर छोट्या गटात रुद्रान्श चव्हाण (प्रथम),विरेन रांजणे(द्वितीय),मानवी हेमण(तृतीय) क्रमांक पटकावला.

या फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे परिक्षण सौ वर्षा पोंक्षे व गौरव पोंक्षे यांनी केले.यावेळी उपस्थितांनी गरब्याचा आनंद लुटला.