
रत्नागिरी : दसरा होऊन गेला तरीही रत्नागिरी सह अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे बुधवारी दुपारी कदम ऊन असताना अचानक पावसाचे ढग जमा झाले आणि पावसाच्या जोरदार सरी रत्नागिरी शहर आणि परिसरात कोसळू लागल्या.

पावसासोबत विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू होता. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसामुळे विद्युत पुरवठा अनेक ठिकाणी ठप्प झाला. भर दुपारी रत्नागिरी शहर आणि परिसरात काळोख पसरला होता. चक्क पावसाळी ऋतू सारखं वातावरण सर्वत्र दिसत होतं. त्यात आज कोजागिरी पौर्णिमा असताना हा पाऊस उशिरापर्यंत थांबून कोजागिरी पौर्णिमा साजरी करणाऱ्याच्या उत्साहावर पाणी फिरवतोय की काय अशी चिंता व्यक्त केली जात आहे.











