रोहिदास समाज सेवा संघ चिपळूण तर्फे ५ रोजी संत रोहिदास महाराज जयंती

Google search engine
Google search engine

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते साजरी होणार!

चिपळूण | प्रतिनिधी : रोहिदास समाजसेवा संघ चिपळूण या सामाजिक संस्थेच्या वतीने रविवार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी रोहिदास भवन मार्कंडी चिपळूण येथे संत रोहिदास महाराज जयंती मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते साजरी केली जाणार आहे, अशी माहिती या संस्थेचे अध्यक्ष सुरेश चिपळूणकर व सरचिटणीस प्रकाश पेढांबकर यांनी दिली.

रोहिदास समाजसेवा संघ चिपळूण या सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच श्री संत रोहिदास महाराज जयंती या उपक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी श्री संत रोहिदास महाराज जयंती मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते साजरी केली जाणार आहे.

यावेळी प्रमुख उपस्थिती आ. भास्कर जाधव, आ. शेखर निकम यांची असणार आहे. हा कार्यक्रम दुपारी १२ ते १.३० वाजण्याच्या सुमारास होईल. यावेळी प्रतिमा प्रतिष्ठापना व पूजन मान्यवरांचे सत्कार, संस्थेचे प्रास्ताविक, मान्यवरांचे मनोगत, आभार व समारोप असे कार्यक्रम होतील.

तरी श्री संत रोहिदास महाराज जयंती कार्यक्रमाला सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.