बांद्यात पावणे दोन लाखाची बेकायदा दारू जप्त

 

 

इन्सुली एक्साईजची कारवाई 

बांदा : प्रतिनिधी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातून कारमधून गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करताना इन्सुली राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. यात १ लाख ८३ हजार ३६० रुपयांच्या दारूसह एकूण ३ लाख ८३ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई आज सकाळी जुना पत्रादेवी रोडवर आरोसबाग तीठा येथे करण्यात आली.

 

शुक्रवारी सकाळी इन्सुली एक्साईज विभागाकडून आरोसबाग तीठा येथे वाहनांची तपासणी सुरू होती. गोव्यातून येणारी कार (एमएच १० सीएक्स ४४८६) तपासणीसाठी थांबविण्यात आली. यावेळी कारमध्ये २० कागदी पुट्ठ्यांमध्ये विविध ब्रँन्डची गोवा बनावटीच्या दारू आढळून आली. याप्रकरणी चालक दिलीप विकास मोरे (३२, रा. साखराळे, सांगली) व अमीर समीर खानजादे (२४, रा. इस्लामपूर, सांगली) यांना  मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.

 

ही कारवाई जिल्हा अधिक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली इन्सुली निरीक्षक भानुदास खडके, दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर, धनंजय साळुंखे, विजय धुमाळ, जवान रणजित शिंदे, दीपक वायदंडे यांच्या पथकाने केली.