डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गभर्वती महिलेच्या पोटात २४ तास बाळ मृतावस्थेत

खेडमधील कळंबनी उपजिल्हा रुग्णालयातील घटनेने खळबळ 
खेड(प्रतिनिधी)
 खेडमधील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी धक्कादायक प्रकार समोर आला. प्रसूतीसाठी  रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेच्या पोटातील बाळ मृत होऊन २४ तास लोटून गेले तरी देखील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर उपस्थित न राहिल्याने ती महिला अक्षरशः मृत्यूच्या दारात झुंज देत राहिली. ही बाब मनसेच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर त्या महिलेच्या पोटातील मृत अर्भकाला शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येऊन महिलेचा जीव वाचविण्यात आला आहे.
सौ. शीतल भंडारे, मंडणगड असे गर्भवती महिलेचे नाव आहे. या महिलेस मंडणगड मधून खेड मधील सरकारी रुग्णालयातदोन दिवसांपूर्वी  उपचारासाठी दाखल. करण्यात आले होते. खेडमधील कळंबनि हे उपजिल्हा रुग्णालय आहे. मात्र तेथील स्त्रीरोगतज्ञ महिन्यातून चार दिवस देखील येत नाहीत. ग्रामीण भागातील गर्भवती मातांची मोठे हाल या ठिकाणी होतात रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या गोरगरीब महिलांना देखील खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो  या भीषण प्रकारामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत.