दिवाणखवटीचे सुपुत्र दादा महादेव गमरे ‘ विशिष्ट योग्यता ‘ पुरस्काराने सन्मानित

???????
खेड (प्रतिनिधी)  तालुक्यातील दिवाणखवटी गावातील बौध्दवाडीचे सुपुत्र, कोकण रेल्वे कर्मचारी, ट्रॅक मेन्टेनर दादा महादेव गमरे यांना नुकतेच १५ ऑक्टोबर या कोकण रेल्वेच्या स्थापनादिनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. संतोष कुमार झा यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि ‘ विशिष्ट योग्यता प्रमाणपत्र ‘ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .
. दादा गमरे हे सध्या कोकण रेल्वेच्या करंजाडी रेल्वे स्थानकात कार्यरत आहेत. . १४ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ४ : ३० वाजता दिवाणखवटी रेल्वे स्थानक जवळ असलेल्या नातूवाडी बोगद्याच्या तोंडावर ४५० घनमीटर मातीसह दगड व दरड आलेली होती. श्री. गमरे यांनी कार्यतत्परता दाखवून याची माहिती विन्हेरे व दिवाणखवटी रेल्वे स्थानकांना दिली. त्यामुळे पुढे होणारा मोठा अनर्थ टळला श्री. गमरे यांच्या या कार्यतत्परतेची व सेवेची दखल घेतली गेली
यावेळी मार्ग आणि कार्य दिग्दर्शक श्री. रामकृष्ण हेगडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनुराग मेश्राम व वित्त निदेशक श्री. राजेश भडंग आदी मान्यवर उपस्थित होते.