साखरपा : वार्ताहर :आज दिनांक 23-10-2024 रोजी सकाळी 6.00 वाजता देवरुख-साखरपा या मुख्य रस्त्यावर बिबट्या मृत अवस्थेत पडला असले बाबत संजय रमाकांत साडविलकर यांनी वनपाल देवरुख यांना दूरध्वनी वरुण कळवले नुसार घटनेबाबत परिक्षेत्र वनअधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार यांना कळवुन वनपाल तौफिक मुल्ला यांनी वनरक्षक सहयोग कराडे,अरुण माळी,सुरज तेली यांचे समवेत घटनास्थळी जाऊन पाहणी केली त्यावेळी साडविलकर यांचे राहते घरा समोरील मुख्य रस्त्यावर बिबट्या पडलेल्या अवस्थेत दिसून आला त्याबाबत बारकाईने पाहणी करता सदर बिबट्या नर जातीचा पूर्ण वाढीचा अंदाजित वय 6 वर्षे वयाचा आहे सदर बिबट्या हा रस्ता पार करत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत झाला असावा असे दिसून आले सदर ठिकाणी मृत बिबट्याचे विविध फोटो घेऊन संशयास्पद काही मिळते का याबाबत सुमारे पाचशे मीटर अंतरात बारकाईने पाहणी केली त्यानंतर मृत बिबट्याचे सर्व अवयव सुस्थितीत असल्याची खात्री करून घटनास्थळी चा पंचनामा करून पुढील उत्तरीय तपासणी साठी मृत बिबट्या ताब्यात घेऊन सदर बिबट्यास देवरुख येथे आणून मा. पशुवैद्यकीय अधिकारी, देवरुख यांचे मार्फत मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले, असता पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सदर बिबट्याचा मृत्यू हा वाहनाच्या धडकेत झाला असावा असे सांगितले सदरची कार्यवाही मा. विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीम.गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण श्रीम .प्रियांका लगड ,वनक्षेत्रपाल रत्नागिरी श्री प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्यास लाकडाची चिता रचून त्याला जाळून नष्ट केले सदर कामगिरी वनक्षेत्रपाल श्री प्रकाश सुतार वनपाल तौफिक मुल्ला ,वनरक्षक दाभोळे श्री. अरुण माळी , वनरक्षक साखरपा सहयोग कराडे , वनरक्षक आरवली सुरज तेली यांनी केली अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने श्रीमती गिरीजा देसाई. विभागीय वनाधिकारी रत्नागिरी यांनी केली आहे.












