मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे लवकरच होणार कुडाळला दाखल

 

माजी खासदार निलेश राणे यांच्या पक्ष प्रवेशाची जय्यत तयारी

खा. नारायण राणे, ना. उदय सामंत, ना. दिपक केसरकर रविंद्र फाटक आदी मान्यवरांची असणार उपस्थिती
निलेश राणे यांना शुभेच्छा देण्यासाठी असणार मोठी उपस्थिती

 

कुडाळ –( संतोष वायंगणकर) माजी खासदार निलेश राणे यांचा आज सायंकाळी शिवसेनेत [Shiv Sena] पक्षप्रवेश होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेचे [Shiv Sena] शिवधनुष्य माजी खासदार निलेश राणे यांच्या हाती देत मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या निलेश राणे प्रेमी आणि महायुतीच्या [Mahayuti] कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे.

महायुतीचे [Mahayuti] रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी आमदार आणि शिवसेना संपर्क नेते रविंद्र फाटक, तसेच शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख संजय आग्रे हे या कार्यक्रमाला उपस्थित असतील. यासोबतच महायुतीचे [Mahayuti] अनेक नेते आणि आमदार पक्षप्रवेश समारंभाला हजेरी लावणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आसाम [Assam] गुवाहाटी येथील कामाख्या देवीचे दर्शन घेऊन थेट या पक्षप्रवेश समारंभाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे निलेश राणे यांना आजच्या पक्षप्रवेशासाठी कामाख्या देवीचा आशीर्वाद मिळणार असल्याचे राजकीय जाणकारांनी मत व्यक्त केले आहे.