राजेश बेंडलांना अखेर महायु्तीकडून उमेदवारी जाहिर

 

गुहागर l प्रतिनिधी :गेली पंधरा दिवस गुहागरच्या जागेचा महायुतीकडून टिढा सुटत नव्हता. भाजपने पहिल्या दिवसापासून या जागेवरती दावा सांगितला होता तर काही दिवसानंतर शिवसेनेकडून या जागेवर दावा सांगण्यात आला. शिवसेनेकडून अनेक नाव ही इच्छुक यादीमध्ये घेण्यात आली होती.

दोन दिवसांपूर्वी गुहागरचे माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी आपल्या सहकार्‍यांसमवेत पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राजेश बेंडल यांना गुहागरची उमेदवारी मिळणार अशी जोरदार चर्चा रंगली. त्यानंतर भाजपने सुद्धा या जागेवरचा दावा सोडला नव्हता, अखेर राजेश बेंडल यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली असून पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 28 रोजी सकाळी 11 वाजता गुहागर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.