खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील आवाशी- माळवाडी येथे ५३ वर्षीय प्रौढाचा राहत्या खोलीत आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना २९ ते ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ७ च्या सुमारास घडली.
प्रदीप रखाळ दास (५३ मूळ गाव बंगाल, सध्या रा. आवाशी-माळवाडी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. तो खोली नं. १ मध्ये भाड्याने राहत होता. घरमालक गुरांच्या गोठ्यात साफसफाई करत असताना निदर्शनास न आल्याने दरवाजातून डोकावून पाहिले असता तो दरवाजात झोपलेल्या स्थितीत आढळला. हाक मारल्यानंतर कोणताही प्रतिसाद न दिल्याने त्याला हलवण्याचा प्रयत्न केला असता त्याने काहीच हालचाल केली नाही. या बाबत पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.










