महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे आज खा. नारायण राणे यांच्या हस्ते उदघाटन

 

 

मालवण | प्रतिनिधी : कुडाळ मालवण विधानसभा महायुती उमेदवार निलेश राणे यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उदघाटन मंगळवार ५ नोव्हेंबर सायंकाळी साडेपाच वाजता मालवण शहरातील मेढा दैवज्ञ भवन नजीक येथे माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे.

 

यावेळी शिवसेना उपनेते संजयजी आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत उपस्थित राहणार आहेत. तरी शिवसेना, भाजप महायुतीच्या सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे. असे आवाहन शिवसेना मालवण तालुकाप्रमुख राजा गावकर महेश राणे भाजप मालवण तालुकाअध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केले आहे.