मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली तक्रार
स्वीट लाईट टायमरच्या टेंडर मध्ये घोळ
रामेश्वर ग्रामपंचायती च्या सरपंचानी स्ट्रीट लाईट साठी टायमर खरेदी करताना व्यवहारामध्ये अनियमितता केली अशी तक्रार गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश पुजारी यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
रामेश्वर गावच्या सरपंच मोनिका ठुकरुल व ग्रामसेवक यांनी गावच्या स्ट्रीट लाईट साठी टायमर खरेदी केले.
23 फेब्रुवारी च्या मासिक सभेत स्ट्रीट लाइट टायमर खरेदी ठराव 02 सप्टेंबर रोजीच्या ग्रामसभेत स्ट्रीट लाइट टायमर खरेदीसंदर्भात तोंडी चौकशी केली असता. समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत यानंतर पुजारी यांनी माहितीच्या अधिकारात माहिती घेतली.
खरेदी प्रक्रियेत GEM पोर्टलचा वापर न करता निविदा प्रक्रियेने वस्तू खरेदी करण्यात आल्या.करारनाम्यासाठी वापरलेले दस्त ऐवज (बॉन्ड) 20 जून 2024 रोजी खरेदी करण्यात आले होते, परंतु वस्तूची कर पावती 29 मे 2024 ची आहे, ज्यातून खरेदी नंतर करारनाम्याचे दस्तऐवज तयार करण्यात आले असल्याचे दिसून येते.
या प्रकरणी आर्थिक अपहार घडल्याची शक्यता निर्माण करते. GEM पोर्टलवर खरेदी केल्यास अपहाराची शक्यता कमी होते; GEM पोर्टलवर वस्तूची किंमत 945 रुपये होती, तरीसुद्धा वस्तू निविदा प्रक्रियेने 4,800 रुपयांत खरेदी करण्यात आल्या. अशा प्रकारे निविदा प्रक्रियेने खरेदी केल्यामुळे जनतेच्या पैशांचा अपहार झाल्याचा संशय पुजारी यांनी व्यक्त केला आहे
या ग्रामपंचायतीने GEM पोर्टलवरून पूर्वी ट्रायसायकल खरेदी केलेली आहे, तरीही सचिवांनी ग्रामसभेत GEM पोर्टलचे प्रशिक्षण नसल्याचे सांगितले. यामुळे ग्रामपंचायत सचिवांमार्फत सरकारच्या विरोधात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट होते .या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करा अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्रकाश पुजारी यांनी केली आहे.











