खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील तब्बल ३२,६५२ ग्राहकांची वीजबिले थकली असून त्यांच्याकडे ९ कोटी ४४ लाख रूपये
थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्याचे मोठे आव्हान येथील महावितरणसमोर आहे. थकबाकी
भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्राहकांनामहावितरणने दणका देण्याची तयारी केल्याची समजते. निवडणूक पार्श्वभूमीवर ग्राहकांचा वीजपुरवठा कितपत खंडित केला जाईल याबाबतही सांशकताच व्यक्त केली जात आहे.
वीजबिलाची रक्कम भरणा करण्यासाठी महावितरणकडून सातत्याने ग्राहकांना सूचना करूनही त्याकडे कानाडोळा केला. महावितरणने ग्राहकांना वीज जोडण्या तोडण्याची तंबी दिल्यानंतर काही ग्राहकांनी बिलाची रक्कम भरली. मात्र उर्वरित ग्राहकांनी अजूनही थकित बिलाची रक्कम भरलेली नाही. यामुळे निवडणूक रणधुमाळीत वीजबिल वसुलीचे आव्हान महावितरणसमोर आहे.











