भोके येथे बिबट्याचा गोठ्यातील नवजात वासरावर हल्ला

 

वासराचा मृत्यू

रत्नागिरी ः प्रतिनिधी : तालुक्यातील भोके येथे बुधवारी पहाटे बिबट्याने गोठ्यातील वासरावर हल्ला केल्यामुळे या गंभिर हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला.
महादेव तुळजा रेवाळे (रा.भोके रेवाळेवाडी,रत्नागिरी) यांचा घरापासून काही अंतरावर त्यांचा गुरांचा गोठा आहे.

 

 

महिन्याभरापूर्वीच त्यांच्या गाईने एका वासराला जन्म दिला होता. मंगळवारी सायंकाळी नेहमी प्रमाणे त्यांनी सर्व गुरे गोठ्यात बांधून ठेवली होती. बुधवारी पहाटेच्या सुमारास रेवाळे यांना त्यांच्या गोठ्यातून गुरांच्या हंबरण्याचा मोठा आवाज ऐकू आला. गुरांच्या आवाजाने आजुबाजुचे इतर ग्रामस्थही जागे झाल्याने त्यांनी गोठ्याच्या ठिकाणी धाव घेतली असता त्यांना बिबट्याच्या हल्ल्यात गंभिर जखमी झाल्याने मृत वासरु दिसून आले. याबाबत रेवाळे यांनी वनविभागाला माहिती दिली असून सायंकाळी उशिरापर्यंत वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले नव्हते.