महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार
मालवण | प्रतिनिधी : पेंडूर परबवाडी येथील ग्रामस्थ व महिला यांना एकत्रित बोलावून वैभव नाईक यांनी त्यांचा प्रवेश उबाठा मध्ये दाखवला होता. मात्र सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येत आम्ही भारतीय जनता पार्टी मध्ये असल्याचे स्पष्ट केले असून महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. भाजपा कुडाळ मालवण संयोजक तथा जिल्हा बँक संचालक बाबा परब यांनी सर्वांचे भाजपात स्वागत केले.
यावेळी विश्राम परब, लक्ष्मण परब, विलास परब, यशवंत परब, भारती गावडे, भावना प्रभू, विणा परब, लक्ष्मी परब, मोहनिष प्रभू, सुधाकर परब, वनिता परब, नितीन परब, चंद्रकांत परब, चंद्रकला परब, आत्माराम परब, सुवर्णा परब, सुरेखा परब, प्रगती परब, श्रीकृष्ण परब, मेगावती धुरी, अलका परब, अपेक्षा परब, ललिता कदम, हरिश्चंद्र परब, निनाद परब, आशीष परब, भरत गावडे, सुभाष परब व इतर ग्रामस्थ व प्रवेशकर्ते उपस्थित होते.
कोणतीही पूर्व कल्पना न देता वैभव नाईक यांनी आमचा प्रवेश घेतला होता. त्यामुळे आम्हाला ते मान्य नसल्याने सांगत वैभव नाईक यांच्या कारभारावर संताप व्यक्त केला.
खासदार नारायण राणे, जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि महायुतीचे कुडाळ मालवण मतदार संघाचे उमेदवार निलेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आमच्या भागातील उर्वरित विकास कामे पूर्ण होतील हा आमचा ठाम विश्वास आहे. असे प्रवेशकर्ते यांनी सांगितले.
गेली अनेक वर्षे नारायण राणे यांच्या माध्यमातूनच गावात विविध विकास कामे झालेली आहेत. पुढे देखील खा. राणे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही यावेळी बाबा परब यांनी दिली. विकासासाठी आम्ही राणे साहेबांच्या नेतृत्वात कटीबद्ध असल्याचे बाबा परब यांनी सांगितले.
यावेळी सरपंच नेहा परब, उपसरपंच सुमित सावंत, शक्ती केंद्र प्रमुख आतिक शेख, दीपा सावंत, पंचायत समिती प्रभारी शेखर फोंडेकर, सतीश पाटील, बूथ अध्यक्ष बिपिन परब, संदेश नाईक, विष्णू लाड, विक्रांत नाईक, बाळा भोगले, नंदू परब, स्वप्नील सावंत, मिलिंद चव्हाण, रवींद्र चव्हाण तसेच इतर ग्रामस्थ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.











