रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर दिनांक 5 नोव्हेंबर 2024 ते 11 नोव्हेंबर 2024 या कालावधीत कुर्धे गावातील राधा पुरुषोत्तम पटवर्धन माध्यमिक विद्यामंदिर,कुर्धे येथे संपन्न झाले. या शिबिराचा समारोप कार्यक्रम 11 नोव्हेंबर 2024 रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर, शिक्षण सुधारक समिति कुर्धेचे उपाध्यक्ष विजयराव शिंदे, मुख्याध्यापक श्री.उदय फडके, लिपिक श्री. संतोष शिंदे, कार्यक्रमाधिकारी प्रा. निनाद तेंडुलकर, प्रा. अभिजीत भिडे, प्रा. स्मिता पाथरे, प्रा. स्नेहा बाणे व ग्रामस्थ व प्रशालेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात एन.एस.एस गीताने व दिपप्रज्वलनाने झाली. प्रा. निनाद तेंडुलकर यांनी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला व सर्वांचे स्वागत केले. यानंतर शिबिरार्थी स्वयंसेवकांनी आपले मनोगत व्यक्त केली ज्यामध्ये त्यांनी ग्रामस्थ व या गावाचे आभार मानले, सात दिवस केलेल्या श्रमदानाविषयी माहिती दिली, झालेल्या सत्रांची माहिती करून दिली व शिबिरामुळे त्यांच्यात कोणते सकारात्मक बदल झाले हे सुद्धा सांगितले. कार्यक्रमाधिकारी मनोगत प्रा. स्मिता पाथरे व प्रा.अभिजीत भिडे यांनी केले. ग्रामस्थ मनोगतात श्री संतोष शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच त्यांना पुढील कॅम्प करता शुभेच्छा दिल्या.
शिक्षण सुधारक समिति कुर्धेचे उपाध्यक्ष विजयराव शिंदे यांनी विचार व्यक्त केले, विद्यार्थ्यांच्या बंधाऱ्याचे कौतुक केले त्यांनी केलेल्या कामामुळे येथील ग्रामस्थांना किती फायदा होणार आहे हे देखील सांगितले. यानंतर मुख्याध्यापक श्री. उदय फडके यांनी मुलांना शाळेत पुन्हा शिबिरासाठी आपले स्वागत आहे असं सांगितलं. कोणत्याही कामाची पूर्तता करण्याकरता आम्ही सज्ज आहोत अशी ग्वाही त्यांनी दिली. पर्यवेक्षक प्रा.विद्याधर केळकर व उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी यांनी ग्रामस्थ सरपंच शिक्षण सुधारक समिती कुर्धे यांचे सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
शिबिरात विविध स्पर्धा झाल्या त्या स्पर्धांचे पाच दिवस विविध गटांनी नियोजन केले त्या गटातून सर्वोत्कृष्ट गट व शिबिरार्थी याचे बक्षीस वितरणाचे सूत्रे प्राध्यापक अभिजीत भिडे यांनी सांभाळली. यामध्ये पुढील बक्षिसे देण्यात आली.
पथनाट्य स्पर्धा विजेता – कार्यक्षम गट
डॉजबॉल विजेता – बादशहा गट
उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा –
प्रथम क्रमांक – कु. पल्लवी निंबरे
द्वितीय क्रमांक – कु. अथर्व सुपल
तृतीय क्रमांक – कु. सेजल गोविलकर
सर्वोत्कृष्ट श्रमदान – कु. तन्मय यादव, कु. सानिका कोकरे
अष्टपैलू शिबिरार्थी – कु. अथर्व सुपल , कु. हर्षा पाथरे
सर्वोत्कृष्ट गटनेता – कु. श्रेया जाधव
आदर्श शिबिरार्थी – कु. राज लाड, कु. गौरी सावंत
आदर्श मार्गदर्शक – कु. कीर्ती जोगळेकर
सर्वोत्कृष्ट गट – कार्यक्षम गट
सर्व विजयी स्वयंसेवकांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देण्यात आलं.
अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. मकरंद साखळकर यांनी मुलांनी विविध ठिकाणी केलेल्या स्वच्छता व वनराई बंधारा बांधकामाच कौतुक केलं. एन.एस.एस ची स्वयंसेवक घडवण्याची परंपरा कायम राहिली आहे व यातून चांगले नागरिक निर्माण होतात व घडतात अशा नागरिकांची देशाला गरज असल्याच प्रतिपादन केलं. शाळा व ग्रामस्थांचे महाविद्यालयाच्या वतीने आभार मानले व पुढील वर्षी असेच नियोजनबद्ध शिबीर गावाला पुन्हा अनुभवायला मिळेल अशी खात्री दिली.
या निवासी शिबिरा अंतर्गत श्रमसंस्कारातून वनराई बंधारा, गणेशगुळे मंदिर स्वच्छता, सर्वेश्वर व महाविष्णू मंदिर व शाळा परिसर स्वच्छता, भात कापणी करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व मानसिक विकास साधनेच्या दृष्टिकोनातून विविध पथनाट्य कार्यशाळा – शुभम बंडबे , प्रभावी संभाषण कौशल्य प्रा.दत्तात्रय वालावलकर, स्वसंरक्षण काळाची गरज- श्री. राम कररा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देत त्यांच्याकडून कृतीयुक्त सहभाग करून घेतला. माजी स्वयंसेवक कु. यश सोवनी याचे विवेकानंद चरित्र यावरती सुश्राव्य असे किर्तन झाले.
कागदकाम कार्यशाळा विद्यार्थ्यांकडून गुलाब पुष्प तयार करून घेण्याचे काम यावर्षीची स्वयंसेविका कु. सेजल सावंत हिने केले, कातळ शिल्पांचा अभ्यास व त्यावरील माहिती श्री आनंद मराठे यांनी दिली, छंदातून स्वयंरोजगार याबद्दलची माहिती श्रीमती स्नेहल कारेकर यांनी दिली, आम्ही बी घडलो या सत्रांमधून प्रा.प्रभात कोकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच एनएसएस मधून विद्यार्थी कसे घडतात याची माहिती दिली. महिला मेळावा जागर स्त्री शक्तीचा या विषयावरती ॲड. प्रिया लोवलेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
प्रश्नमंजुषा ,उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा ,गटश: कौशल्य सादरीकरण, पथनाट्य स्पर्धा इत्यादीचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्नेहा बाणे यांनी केले व आभार प्रा. निनाद तेंडुलकर यांनी मानले या शिबिराचे नियोजन प्राचार्य व उपप्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली एन.एस.एस कार्यक्रम अधिकारी प्रा. निनाद तेंडुलकर प्रा. अभिजीत भिडे प्रा. स्मिता पाथरे, प्रा. स्नेहा बाणे प्रा. अन्वी कोळंबेकर, श्री. गोरख घाडगे यांनी यशस्वीपणे केले