चिपळुणात १७ रोजी मोफत ऑर्थोपेडिक आणि स्पाइन मणका तपासणी शिबिराचे आयोजन

चिपळूण (प्रतिनिधी) : झिक्रा ग्लोबल फाउंडेशन चिपळूण व डॉ. नोमान अत्तार यांचे ऑर्थोपेडिक आणि स्पाइन हेल्थ केअर सेंटर चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. १७ नोव्हेंबर रोजी मोफत ऑर्थोपेडिक आणि स्पाइन मणका तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील खेडेकर क्रीडा संकुलाच्या मागे, शिव नदी पुलाजवळ ऑर्थोपेडिक आणि स्पाइन हेल्थ केअर सेंटर चिपळूण येथे हे शिबिर होणार आहे.

 

 

या शिबिरामध्ये गुडघेदुखी, सांधेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, संधिवात, आमवात यावर मोफत तपासणी केली जाणार आहे. तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन केले जाणार आहे. या शिबिरामध्ये हाडांची ठिसूळता व तपासणी, यूरिक ॲसिड तपासणी मोफत केली जाणार आहे. तसेच एक्स-रे व रक्त-लघवी तपासणीमध्ये ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. डॉ. ओमान अत्तार हे मणक्याचे नस मोकळी करणे, सांधे बदलणे, गुडघा व खुबा बदलणे, गुंतागुंतीचे फ्रॅक्चर या सर्व क्षेत्रांमध्ये निपुण आहेत. तरी जास्तीत जास्त रूग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या शिबिरात नावनोंदणीसाठी ९६८९८४९७८९ या नंबरवर संपर्क साधावा.