पोद्दार इंटरनॅशनलच्या सुरभी पाटील हिला भोपाळ येथील तायक्वांदो स्पर्धेत कांस्यपदक

 

रत्नागिरी : पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, रत्नागिरी येथील विद्यार्थिनी कुमारी सुरभी तेजश्री राजेंद्र पाटील हिने नुकत्याच विदिशा, भोपाळ, मध्य प्रदेश येथे झालेल्या 68 व्या स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित तायक्वांदो स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील मुलींच्या स्पर्धेत आणि 18 ते 20 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले.

सदर स्पर्धा ही देश पातळी वरील सर्वोच्च शालेय स्पर्धा असून या अगोदर तिने सीबीएससी द्वारा आयोजीत झोनल आणि नैनिताल उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. यासाठी गणराज तायकांडो क्लब, रत्नागिरीच्या श्रीमती रंजना मकवाना, प्रशांत मकवाना तसेच पोद्दार इंटरनॅशनल स्कूल शाळेकडून प्रिन्सिपल राकेश चव्हाण, महिला क्रीडा प्रशिक्षक श्रीमती सपना सापते यांचे मार्गदर्शन लाभले. लहान वयात असे राष्ट्रीय यश मिळवल्याबद्दल सुरभीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे, तसेच तिला पुढील खेळामधील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.