भारतीय चर्मकार समाज संघटनेचा सिंधुदुर्गमधील महायुतीच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा

 

निलेश राणे यांना पाठिंब्याचे पत्र केले सादर

रत्नागिरी : भारतीय चर्मकार समाज मुंबई, महाराष्ट्र संघटनेने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. तसे पत्र राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण, राज्य सरचिटणीस अरुण होडवडेकर यांनी कुडाळ मालवणचे शिवसेनेचे उमेदवार निलेश राणे याना दिले आहे. यावेळी भारतीय चर्मकार समाजचे रत्नागिरी अध्यक्ष संजय निवळीकर उपस्थित होते.

त्यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस संतोष जाधव, युवक अध्यक्ष भारत पेंडुरकर, कोकण उपाध्यक्ष बाबल पावसकर, जिल्हा सहसचिव अंकुश चव्हाण महिला जिल्हा अध्यक्ष मानसी चव्हाण, जेष्ठ नागरिक अध्यक्ष रमेश कुडाळकर, वेंगुर्ला अध्यक्ष कांता चव्हाण, वेंगुर्ला सचिव सुनील चव्हाण, सावंतवाडी अध्यक्ष सुदेश किनवडेकर, रमेश सोनवडेकर व चर्मकार समाज बांधव उपस्थित होते. या सर्वानी महायुतीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व उमेदवारांना पाठिंबा घोषित केला आहे.