शिक्षणाधिकारी सुवर्णा सांवत यांनी विद्यार्थ्यांची रेल्वे, स्टेशनवर भेट घेत बालदिनाच्या दिल्या शुभेच्छा

 

माखजन : वार्ताहर : चिपळूणतील युनायटेड इंग्लिश स्कूल च्या गुरूकुल विभागातील इयत्ता ६ वी ते ८ वी चे विद्यार्थ्यांसाठी मातृभूमी परीचय शिबिर राजापूर येथे आयोजित केलेले होते. ३० विद्यार्थी व ४ शिक्षक या शिबीरात सामिल झाले होते.

 

 

१४ नोव्हेंबर रोजी, चिपळूण कडे परतीचा प्रवासासाठी रत्नागिरी रेल्वे स्टेशन तुतारीने एक्सप्रेस ची वाट पहात सर्व विद्यार्थी व शिक्षक थांबलेले होते.
अचानक कामानिमित्ताने बाहेरगावाहून रत्नागिरी स्टेशन वर आलेल्या रत्नागिरी च्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सौ सुवर्णा सावंत यांना रेल्वेस्टेशनवर गणवेशात मुले दिसली.विद्यार्थी दिसताच थेट घरी न जाता त्या विद्यार्थ्यांकडे वळल्या व विद्यार्थ्याशी संवाद साधला.विद्यार्थ्यांची आत्यंतिक प्रेमाने विचारपूस केली. मोकळपणाने संवाद साधला व विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या.सौ सुवर्णा सावंत यांनी अचानक विद्यार्थ्यांना भेट दिल्यामुळे,जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी विद्यार्थ्याना जवळून पहाता आल्या. याचे विद्यार्थ्यांना कुतूहल वाटले

 

 

चिपळूण दौऱ्यावेळी युनायटेड च्या गुरूकुल ला नक्की भेट देईन असं आश्वासन ही दिलं.
नुसत्या बाल दिनाच्या शुभेच्छा न देता ,आईच्या ममतेने विद्यार्थ्यांची चौकशी केली.व शिक्षणातील अडीअडचणी देखील जाणून घेतल्या.यावेळी युनायटेड च्या गुरुकुल विभागाचे शिक्षक, माध्यमिक शिक्षण खात्यातील अधिकारी देखील उपस्थित होते.