माखजन : वार्ताहर : गुहागर तालुक्यातील कुडली येथील श्री देव लक्ष्मी नारायण देवस्थान,ब्राह्मणवाडी येथे कार्तिकी उत्सवानिमित्त झालेल्या स्वरमधुर ,स्वरगंध या संगीत मैफिलीला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला व गायकांनी सादर केलेली एका पेक्षा एक गाण्यांनी रसिक भारावले.
ही मैफल महाराष्ट्र संगीत नाट्य गौरव पुरस्कार प्राप्त झालेले ,विख्यात गायक विशारद गुरव (चिपळूण),विपुल निमकर(गुहागर),देवश्री शहाणे(रत्नागिरी) यांनी रंगवली.
मैफिलीची सुरवात सप्तसुर झंकारीत बोले या नांदी ने झाली.यानंतर विपुल निमकर याने हरी हरा ओंकारा,नारायणा रमा रमणा,श्रीरंगा कमला कांता,आदी गाणी पेश केली तर देवश्री शहाणे हिने सोहम हर डमरू वाजे,अंगणी पारिजात फुलला ही गाणी गायली.
विशारद गुरव यांनी जय शंकरा,निराकार ओंकार,युवती मना,सुरत पिया आदी गाणी आळवली. सादरीकरणाला श्रोतु वर्गातून टाळ्यांचा गजरात उदंड प्रतिसाद मिळाला.गायन मैफिलीची सांगता अगा वैकुंठीच्या राया या गाण्याने झाली
या मैफिलीत तबला साथ प्रथमेश शहाणे तर ऑर्गनची साथ ज्येष्ठ ऑर्गन वादक विलास हर्षे यांनी केली.देवस्थांकडून उपस्थितांकडून आभार मानण्यात आले.











