हॅट्रीक विजयाची…विकासगतीची, कोकणच्या अस्मितेची..!

कणकवलीत मतमोजणी अगोदरच आ.नितेश राणें झळकले बॅनर 

स्वाभिमान प्रतिष्ठान वरवडेच्यावतीने अचित कदम, सुभाष मालंडकर यांनी लावले बॅनर

 

कणकवली, दि. 22 नोव्हेंबर

कोकणात राजकारण राजकीय चढओढ ही फार मोठी असते. त्यात राजकीय निकाल म्हटल्यावर हटके स्टाईलने विजयोत्सव साजरा केला जातो. कणकवली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी दि.२३ नोव्हेंबरला आहे. त्यापुर्वीच कणकवली विधानसभा मतदार संघात विद्यमान आ.नितेश राणे यांच्या विजयाचे ठिकठिकाणी बॅनर झळकले आहेत. या बॅनरवर हॅट्रीक विजयाची…विकासगतीची, कोकणच्या अस्मितेची..! या टॅगलाईनखाली बॅनर स्वाभिमान प्रतिष्ठान वरवडेच्यावतीने अचित कदम, सुभाष मालंडकर यांनी लावले आहेत.

विद्यमान आमदार नितेश राणे यांनी तिसऱ्यांदा निवडणुक भाजपच्या चिन्हावर चढवली. गेल्या दहा वर्षात असलेला लोकसंपर्क, विकासकामांच्या माध्यमातुन उभारलेले नेटवर्क, भाजपाचे मजबुत संघटन, पहिल्यांदाच कणकवलीत एकही गुन्हा न दाखल होता झालेली निवडणुक यामुळे आ.नितेश राणे यांच्या कार्यकर्त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी होण्याचा विश्वास आहे. त्यामुळे निकालापुर्वीच ठिकठिकाणी आ.नितेश राणे यांच्या विजयी हॅट्रीकचे बॅनर कार्यकर्त्यांनी लावले आहेत.

विद्यमान आमदार नितेश राणे विरुद्ध महाविकास आघाडीचे संदेश पारकर यांच्यात खरी लढत आहे. त्यामुळे २३ नोव्हेंबरला ८ वाजेपर्यंत मतमोजणी सुरु होईल, दुपारी १२ वाजेपर्यंत निकाल अपेक्षीत आहे. त्यामुळे निकालापुर्वीच लागलेल्या आ.नितेश राणेंच्या विजयाच्या बॅनरची चर्चा सर्वत्र होत आहे.