निलेश राणे आमदार झाले आणि १० वर्षांनी लांजाच्या ओंकारने घातले चप्पल

संतोष कोत्रे | लांजा –: जोपर्यंत माझे साहेब म्हणजेच निलेश राणे हे आमदार किंवा खासदार होत नाहीत तोपर्यंत मी माझ्या पायात चप्पल घालणार नाही असा पण करून गेली दहा वर्षे अनवाणी फिरणाऱ्या लांजातील ओंकार आंब्रे याची तपश्चर्या फळाला आली. निलेश राणे आमदार झाले. आपल्यासाठी अनवाणी फिरणार्या ओंकारला निलेश राणे यांनी बोलावून घेत आपल्या पायातील चप्पल त्याला घालायला लावून त्याची प्रतिज्ञा पूर्ण केली. निष्ठावंत कार्यकर्ता आणि त्याच्यावर प्रेम करणारे साहेब याचे उदाहरण या घटनेने दिसुन आले.

 

निलेश राणे हे खऱ्या अर्थाने लोकनेता म्हणून ओळखले जातात. त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत. अशापैकी एक म्हणजे लांजातील ओंकार आंबे होय. साहेबांवर जीवापाड प्रेम करणार्या या युवा कार्यकर्त्याने सन 2014 मध्ये खासदारकीच्या निवडणुकीत निलेश राणे यांचा पराभव झाल्यानंतर ओंकार यांने प्रतिज्ञा केली की जोपर्यंत निलेश राणे साहेब खासदार किंवा आमदार होत नाहीत तोपर्यंत मी माझ्या पायात चप्पल घालणार नाही. त्यानंतर गेली दहा वर्षे ओंकार हा पायात चप्पल न घालता साहेबांच्या विजयाच्या प्रतिक्षेकडे डोळे लावून बसला होता.
गोर गरीब लोकांच्या मदती साठी ओंकार कायमच पुढे राहिला. साहेबासाठी हा कार्यकर्ता अनवाणी पायपीट करून गावोगावी फिरून लोकसभे साठी दिखील मोठे काम केले. त्या नंतर गेली वर्ष भर कुडाळ मालवण या मतदार संघामध्ये देखील घरोघरी जाऊन निलेश राणे यांचा प्रचार केला. गेली १० वर्ष अनवाणी सघर्षाची अखेर सांगत झाली. निलेश राणे आमदार झाले आणि कार्यकर्त्याचे अश्रु अनावर होऊन आंनद गगनात मावेनास झाला. रात्री उशीरा ही गोष्ठ निलेश राणे यांच्या लक्षात आली आणि त्यांनी ओंकारला बोलवून घेतले आणि प्रेमाने मिठी मारली.तसेच आपल्या पायातील त्याला चपल घालायला लावत त्याचा 10 वर्षांचा अनवाणी फिरण्याचा वनवास संपवला.
खरोखरच लोकनेता कसा असावा आणि त्याच्यावर प्रेम करणारे त्याचे कार्यकर्ते कसे असावेत याचे उत्तम उदाहरण या घटनेने दिसून आले