जयवंत दळवी जन्मशताब्दी वर्षानिमित्त तालुकास्तरीय वाचक स्पर्धा
सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ व श्रीराम वाचन मंदिर यांचे आयोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी : आपल्यावर संस्कार करणारे साहित्य वाचायला हवे. प्रश्न निर्माण करणारे साहित्य हवे. दुसऱ्याच्या सुखदुःखात सहभागी होता येते असे साहित्य संग्रह वाचायला हवेत. प्रश्न निर्माण करणारे साहित्य लेखन साने गुरुजींच्या कथासंग्रहामध्ये आहे. मात्र, ज्या साहित्य वाचनातून आपल्याला संस्कार मिळतात असे साहित्य लेखनच वाचायलाच हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर भागवत यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ व श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने लेखक जयवंत दळवी जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने तालुकास्तरीय वाचक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव विठ्ठल कदम संचालक भरत गावडे, संचालक ॲड. संतोष सावंत, प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम वाचन मंदिर चे कार्याध्यक्ष रमेश बोंद्रे, आरती मासिकचे प्रभाकर भागवत, प्रा. जी ए बुवा, रवींद्र भागवत, वाचन मंदिरचे ग्रंथपाल महेंद्र पटेल आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत अंकिता संतोष पाटील प्रथम, व्दितीय तन्वी गणेश परब तर तृतीय प्रगती सदानंद परांजपे यांनी क्रमांक पटकाविला. तर उत्तेजनार्थ बक्षिस सृष्टी प्रशांत पाटील यांना देण्यात आले. हे स्पर्धक जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
यावेळी बोलताना प्रा. जी ए बुवा म्हणाले, वाचक स्पर्धेतून तुम्ही जे भाष्य करता ते भाष्य तुम्ही लिखाणातून सादर करा. तर विठ्ठल कदम व संचालक भरत गावडे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी सुप्रिया केसरकर प्रवीण ठाकूर दत्तात्रेय कदम रश्मी सावंत श्रिया भागवत. प्रकाश माणगावकर आदी उपस्थित होते.
विजेत्या पहिल्या तीन क्रमांकांना पारितोषिक देण्यात आले तर भाग घेतलेल्या सर्व स्पर्धाकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.












