माखजन : वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल येथे जिल्हास्तरीय निसर्गचित्र व दशक्रोशिस्थ चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री अशोकजी पोंक्षे कलादालनाच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.३ डिसेंबर रोजी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.दशक्रोशीस्थ माध्यमिक,प्राथमिक शाळांसाठी होणाऱ्या स्पर्धेत ३ री ते ४ थी असा पहिला गट ५ ते ७ वी दुसरा गट,८ वी ते १० वी तिसरा गट असेल त्यासाठीप्रथम क्रमांक येणाऱ्यास १ हजार ५०१ ,द्वितीयस १हजार १,तृतीयस सातशे एक,उत्तेजनार्थ ला पाचशे एक रुपये व प्रत्येकास शिल्ड व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
पहिल्या गटासाठी रंगभरण ,दुसऱ्या व तिसऱ्या गटाला A 4 साईझ पेपर दिला जाईल.तर जिल्हा स्तरीय निसर्गचित्र स्पर्धेसाठी १८ वय पूर्ण असलेल्या कोणत्याही व्यक्तीला या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.या स्पर्धेत प्रथम क्रमांकास ७हजार ७७७रु,द्वितीयस ५ हजार ५५५रु,तृतीयस ३ हजार ३३३रु,चतुर्थस १ हजार १११ रुपये व शिल्ड आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.दोन्ही स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य आहे.
आजवर पंचक्रोशिस्थ चित्रकला स्पर्धेसाठी ३५० हुन अधिक स्पर्धक सहभागी झाले आहेत तर जिल्हास्तरीय निसर्गचित्र स्पर्धेसाठी ५० स्पर्धक सहभागी झाले आहेत.
सहभागी होण्यासाठी व अधिक माहिती साठी अमोल पाटील९५८८४३८२३६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.या स्पर्धेचे बक्षीस वितरण आंबव पोंक्षे येथील श्री सूर्यनारायण संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ रंगकर्मी व सामाजिक कार्यकर्ते श्री अशोक पोंक्षे यांच्या हस्ते ९ डिसेंबर रोजी सकाळी प्रशालेच्या गुरुदक्षिणा सभागृहात होणार आहे.
जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन संस्था अध्यक्ष किशोर साठे,सचिव दीपक पोंक्षे यांनी केले आहे.










