चिपळूण :–सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या ६७व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दिनांक २९नोव्हेंबर रोजी सह्याद्रि टॅलेंट बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते
सदर स्पर्धा १४वर्षांखालील विद्यार्थी, १७वर्षाखालील विद्यार्थी तसेच खुला अशा ३ गटांमध्ये घेण्यात आली.तिन्ही गटांमधून एकूण १३६ स्पर्धक प्रवेशित झाले होते.
आंबडस विद्यालयातील एकूण ५ विद्यार्थी खेळाडूंनी यामध्ये सहभाग नोंदवला होता.यामध्ये १७वर्षाखालील वयोगटात एकूण ४ स्पर्धा फेऱ्यामध्ये विद्यालयातील इ.९वी मध्ये शिकत असणारी विद्यार्थिनी कु.सृष्टी सचिन जाधव हिने चारही फेऱ्यामध्ये चांगले यश संपादित करत तृतीय येण्याचा मान पटकावला. सदर बुद्धिबळ स्पर्धेचे प्रमुख प्रशिक्षक निलेश साळवी , सावर्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे तसेच सह्याद्रि शिक्षण संस्थेचे मुख्य क्रीडा प्रशिक्षक कळंबे सर आदींच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन सृष्टीला गौरविण्यात आले.सदर स्पर्धेकरिता सृष्टीला क्रीडा शिक्षक भास्कर महाडिक व संतोष शिंदे आदींचे मार्गदर्शन लाभले.
सदर यशाबद्दल विद्यालयाचे चेअरमन अशोक निर्मळ , मुख्यध्यापक विलास चोरगे तसेच सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.











