महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री ना. नारायणराव राणे यांच्या विजयासाठी शिवसेना चिपळूण सज्ज!

शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

चिपळूण (संतोष सावर्डेकर):– रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री ना. नारायणराव राणे यांच्या प्रचारार्थ शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत राणेंना चिपळूण तालुक्यातून मताधिक्य देण्यासाठी शिवसेना चिपळूण सज्ज असल्याचा शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी निर्धार व्यक्त केला.

 

 

 

या बैठकीत मार्गदर्शन करताना शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण यांनी सांगितले की, संपूर्ण जगामध्ये एक अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेले, जगामध्ये आपल्या भारताची मान स्वाभिमानाने ताठ ठेवणारे, देशाचे भवितव्य आणि सर्वांगीण विकासाचे व्हिजन असलेले नेतृत्व आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान पदावर विराजमान करण्यासाठी आपले महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे यांना मोठया मताधिक्याने निवडून आणायचे आहे. त्यासाठी आपण सर्व उत्साहाने कामाला लागलेले आहोत. आपले महायुतीचे उमेदवार नक्कीच मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. आपण सर्वांनी प्रचाराचा उत्साह कायम ठेवून प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचा, असे आवाहन करतांना महायुतीचा विजय निश्चित आहे, असे स्पष्ट सांगितले.

 

 

 

यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य शशिकांत चाळके, पं.स.माजी शिवसेना गटनेते अभयदादा सहस्त्रबुद्धे, शिवसेना क्षेत्रप्रमुख अनंतराव पवार, तालुकाप्रमुख संदेशबापू आयरे, तालुका समन्वयक दिलीपराव चव्हाण, शहरप्रमुख उमेश सकपाळ, अल्पसंख्याक तालूका प्रमुख महम्मदभाई फकीर, माजी उपनगराध्यक्ष सुधीरशेठ शिंदे, महायुती निवडणूक तालुका समन्वयक रुपेश घाग, महिला आघाडी तालुका संघटक सुप्रिया सुर्वे, शहर संघटक प्राजक्ता टकले, युवासेना तालुका अधिकारी निहार कोवळे, अल्पसंख्याक शहर प्रमुख माजी नगरसेवक करामतशेठ मिठागरी, माजी नगरसेविका स्वाती दांडेकर, संजीवनी घेवडेकर, युवासेना शहर अधिकारी विनोद पिल्ले, युवती शहर संघटक शिवानी शिंदे उपस्थित होते. यांचेसह या बैठकीला शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे सर्व उपतालुकाप्रमुख, सचिव, उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, विभाग संघटक, उपविभाग प्रमुख, उपविभाग संघटक व आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.