सावंतवाडी । प्रतिनिधी : कै. महादेव उर्फ बंड्या ठाकुर यांच्या स्मरणार्थ संदिप सावंत गोठण मित्रमंडळ व महापुरुष मित्रमंडळ मधला आवाठ खासकिलवाडा, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने खुली फ्री आर्म अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा दिनांक ७ व ८ डिसेंबर रोजी प्लेन पार्क महादेव भाटले, संदिप सावंत यांच्या घराच्या बाजुला या ठिकाणी होणार आहे. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रुपये ७ हजार व चषक तर द्वितिय पारितोषिक ३ हजार ५०० रुपये व चषक आहे. तसेच उपांत्य फेरीतीत्य पराभूत संघांना ११११ रु. अनुक्रमे पारितोषिक ठेवण्यात आले आहे.
तर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तसेच शिस्तबद्ध संघ, सामानावीर, मालिकावीर अशी आकर्षक बक्षिसे या स्पर्धेत ठेवण्यात आली आहेत. या स्पधेचे प्रवेश शुल्क ७०० रु. आहे. प्रत्येक संघात ७ खेळाडू राहतील. अधिक माहितीसाठी संपर्क ओंकार कुडतरकर – ९४२०७९५१६२ यांच्याशी संपर्क साधावा तसेच जास्तीत जास्त संघांनी या स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.












