खेड | प्रतिनिधी :
खेड तालुक्यातील खारी-वाळंजवाडी येथील आर्यन सुभाष मोहिते या ११ वर्षीय मुलाचा कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात १४ डिसेंबररोजी रात्री ९.३० वाजता दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यु अशी नोंद केली आहे.
आर्यन मोहिते याला फिट येण्याची सवय होती. तो त्यांच्या घराशेजारील अंगणात खेळत असताना त्याला अचानक फिट आल्याने तो खाली पडला, म्हणून त्याला जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र कोरेगाव येथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचाराकरीता कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर औषधोपचार सुरु असताना तो मयत झाला. म्हणून आकस्मिक मृत्यु अशी नोंद करण्यात आली आहे.











