खेड(प्रतिनिधी)नाताळसह नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेली सीएसएमटी मुंबई-करमाळी नियमित स्पेशल २० डिसेंबरपासून कोकण मार्गावर धावू लागली आहे. ५ जानेवारीपर्यंत स्पेशलच्या ३४ फेऱ्या नियमितपणे धावणार असल्याने गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांना दिलासा मिळाला आहे.
०११५१/०११५२ क्र.ची सीएसएमटी मुंबई-करमाळी स्पेशल सीएसएमटी येथून रात्री १२.२० वा. सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वा. करमाळी येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात करमाळी येथून दुपारी २.१५ वा. सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वा. सीएसएमटी येथे पोहचेल. २२डब्यांच्या स्पेशलला दादर-ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम स्थानकात थांबे आहेत.












