मंडणगड l प्रतिनिधी – मंडणगड तालुका विकास मंडळ संचालित शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, मंडणगड या महाविद्यालामध्ये वार्षीक स्नेहसंमेलनांचे औचीत्यसाधून विद्यार्थ्यांकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 24 डिसेंबर 2024 रोजी विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन सांस्कृतीक कार्यक्रमध्ये विद्यार्थी व पालकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. स्नेसंमेलन कार्यक्रमासाठी शहरातील कलारसिक प्रेक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेतील मुले पांरपारी वेषात मंचावर अवतरली होती. बहारदार गाण्याच्या अप्रतिम सादरीकरणाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले.
यावेळी आयोजित स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मंडणगड तालुका विकास मंडळ संस्थेचे उपाध्यक्ष, जिल्हा बँक संचालक रमेश दळवी यांनी भूषवले. हायस्कूलची यशस्वी वाटचाल, हायस्कूलची शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांनी मिळवलेले प्राविण्य याबाबत मुख्याध्यापक आबासाहेब हुलगे यांनी विस्तुर्त प्रस्थावना मांडत गुणवत्तेलाच हायस्कूलमध्ये कायम अग्रस्थान असेल, त्यामुळे आपल्या शाळेतून गुणवंत विद्यार्थी घडतील असे मत त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. यावेळी संस्थेचे चिटणीस अँड. अभिजित गांधी प्रशालेच्या गुणवत्तेबाबत कौतुक केले, विद्यालयात गुणवत्तेबरोबरच शिस्तप्रियताही तितकीच महत्वपूर्ण आहे. महापुरुषांच्या नावाने हायस्कूल असल्याने महापुरुषांच्या नावाचे पावित्र्य जपणे महत्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्याक्रमचे अध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष रमेश दळवी यांनी शाळेचे व आयोजित कार्याक्रमचे कौतुक केले व शाळेच्या नवीन इमारतीसंदर्भात कार्यवाही लवकरच सुरु होणार असल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी हायस्कूलमधील जिल्हा, तालुका स्तरावर क्रीडा व विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. हायस्कूलच्या एका रूमला काही महिन्यांपूर्वी लागलेल्या आगीच्या प्रसंगात प्रसंगावधान दाखवत बचावकार्य केल्याने दुर्घटना टळली, या प्रसंगात प्रसंगावधान दाखवणारे नगरसेवक विनोद जाधव, तहसीलचे मंडल अधिकारी निलेश गोडघासे, विकास साळवी, समीर साळवी, रुपेश घोसाळकर, पोलीस काँस्टेबल अक्रम माने यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात यावेळी मंडणगड तालुका विकास मंडळ संस्थेचे उपाध्यक्ष रमेश दळवी, विजय मोरे, चिटणीस अँड. अभिजित गांधी, माजी जि. प. सदस्य संतोष गोवळे, नगरपंचायत गटनेते विनोद जाधव, खजिनदार विलास मालुसरे, चिटणीस संतोष मांढरे, संचालक प्रसाद हेंद्रे, राकेश शिंदे, पराग लेंडे, मुख्याध्यापक आबासाहेब हुलगे, उपमुख्याध्यापक अर्जुन हुल्लोळी, हायस्कूलच्या निवृत्त मुख्याध्यापक बी. जे. पाटील, सौ. पाटील, साहेबराव वाघमारे,रामदास गवारी,शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, शशिकांत जाधव, मंडलअधिकारी निलेश गोडघासे आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक आबासाहेब हुलगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेचे शिक्षक एस.बी. अवेरे, सुनील घोसाळकर, सुशील देवघरकर, स्वरा देवघरकर, शैलेश खताते,ज्योती राणे आदि शिक्षिका, शिक्षक, कर्मचारी यांनी मेहनत घेतली.










