माखजन | वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन मराठी मध्ये शिकणारी शुभ्रा संतोष धामणाक हिने विविध स्पर्धांमध्ये चमक दाखवली आहे.केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धात थाळी फेक प्रकारात प्रथम,लांब उडी मध्ये द्वितीय
प्रभागस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धेत लांब उडी मध्ये द्वितीय येत तालुका स्तरावर निवड झाली.तर कबड्डी प्रकारात केंद्र,प्रभाग स्तरावर आपली चुणूक दाखवत शुभ्रा तालुका स्तरावर पोहचली,तालुका स्तरावर चमक दाखवत जिल्हा स्तरावर होणाऱ्या कबड्डी सामान्यांसाठी संघात समावेश करण्यात आला आहे.
शुभ्राला मुख्याध्यापिका सौ कल्पना नांदिवडेकर शिक्षक रवींद्र घाणेकर,मितेश पळे सौ सुप्रिया जाधव आदींचे मार्गदर्शन लाभले.











