मसूरे | झुंजार पेडणेकर : मालवण तालुक्यातील कट्टा गावचा सुपत्र गौतम प्रियांका दीपक भोगटे याने चार्टर्ड अकाऊंटंट परीक्षेत यश मिळवले आहे. अत्यंत कठीण अशा परीक्षेत गौतम याने यश प्राप्त केल्याने त्याचे अभिनंदन होत आहे.
गौतमचे प्राथमिक शिक्षण कट्टा मराठी शाळा व
१० वी पर्यंतचे शिक्षण वराडकर हायस्कूल कट्टा येथे मराठी माध्यमातुन झाले.
७ वी स्कॉलरशीप व आठवी एनएमएमएस परीक्षेत तो मेरीटला आला होता.
एसएससी परीक्षेत ९३ टक्के टर १२ वीला ८४ टक्के गुण प्राप्त केले होते. कॉमर्स ग्रेज्युएशन
वर्तक कॉलेज वसई येथे झाले. बॅरिस्टर नाथ पै सेवांगणचे कार्यवाह व कट्टा येथील प्रसिद्ध उद्योजक दीपक भोगटे यांचा तो चिरंजीव आहे.












